श्रीतेज प्रतिष्ठानतर्फे रविवारी भव्य आयोजन : आशिष बोबडे यांच्या उपस्थितीत खाद्य महोत्सव

By : Shankar Tadas
गडचांदूर : येथील श्रीतेज प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण कार्यशाळा, गडकिल्ले प्रदर्शन स्पर्धा आणि श्रीतेज बचत गट खाद्य महोत्सवचे आयोजन रविवार, 16 मार्च रोजी महात्मा गांधी विद्यालयाजवळील शिवाजी महाराज चौकात करण्यात आले आहे. चिमूर का छोकरा नावाने प्रसिद्ध यूट्यूबर आशिष बोबडे याप्रसंगी उपस्थित राहणार आहे. दुपारी 12 ते 3 वाजता राजुराच्या उपविभागीय अधिकारी कश्मिरा संख्ये आणि पर्यावरण शास्त्रज्ञ सोहम पंड्या, रत्ना पंड्या महिला सक्षमीकरण विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या हस्ते गड किल्ले प्रदर्शन स्पर्धेचे उदघाटन होईल. सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत आशिष बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीतेज खाद्य महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या भव्य आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश ताजने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here