लोकदर्शन गडचांदूर 👉अशोककुमार भगत
स्थानिक गडचांदूर येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहात महिला दिनानिमित्य प्रबोधन व गीत गायन समारंभ नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी गडचांदूर च्या प्रमुख आशाताई सोनंडवले होत्या. तर अतिथी म्हणून प्रा
कविता बांदरे, प्रा माधुरी उके
शिलाताई राहुल निरंजने,
बेबीताई वाघमारे,सीमाताई खैरे उपस्थित होत्या.
यावेळी प्रा कविता बांदरे व प्रा माधुरी उके यांनी महिलांनी प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केल्याचे सांगितले. शिलाताई निरंजने, सीमाताई खैरे, बेबीताई वाघमारे, आशाताई सोंडवले, प्रा. कीर्तीकुमार करमणकर यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. याप्रसंगी कमलाबाई वाघमारे व सुमित्राबाई वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वर्षाताई निरंजने, मीराबाई खैरे, शिलाताई आशील निरंजने यांनी सुमधुर गीत गायिलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मायाताई दुर्गे यांनी केले.
सूत्रसंचालन आम्रपाली कठाने तर आभार प्रदर्शन वर्षाताई निरंजने यांनी केले.
यशस्वीतेसाठी राहुल निरंजने भारत ताकसांडे, कवडू उपाध्ये, आशील निरंजने, श्रावण जीवणे बौद्धचार्य व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.