महिला केवळ कुटुंबाचा आधार नाहीत तर त्या समाजाची शक्ती आहे : डॉ. डोर्लीकर

लोकदर्शन जिवती 👉 प्रा. गजानन राऊत

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विदर्भ महाविद्यालय जिवती येथील महिला सक्षमीकरण विभागातर्फे व प्राचार्य डॉ. शाक्य मॅडम यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयात महिला दिन सोहळा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता *”आधुनिक स्त्री व आव्हाने”* या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापिका डॉ. डोर्लीकर तर मार्गदर्शक म्हणून मंचावर डॉ.गजानन राऊत, प्रा. संजयकुमार देशमुख, प्रा. गंगाधर लांडगे, प्रा. संजय मुंडे उपस्थित होते. आजच्या आधुनिक महिलांनी स्वतःच्या अधिकारांसाठी पुढे आले पाहिजे. जगात महिला पुरुष समानता फक्त शब्दांपूर्ती मर्यादित न ठेवता, तिला प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. स्त्रिया केवळ कुटुंबाचा आधार नाहीत तर त्या समाजाची शक्ती आहेत. असे विचार डॉक्टर डोर्लीकर यांनी अध्यक्षिय भाषणातून मांडले. तर महिलांच्या हक्कांच्या दिशेने झालेल्या प्रगतीचे चिंतन करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधींना आत्मासात केले पाहिजे . यानिमित्ताने समाजातील प्रत्येकाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि लिंग समानतेसाठी आपले योगदान देण्याचा संकल्प केला पाहिजे असे मत मंचावरील प्रमुख पाहुण्यांनी आपापल्या विचारातून व्यक्त केले.
वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आणि आजच्या स्त्रियांपुढील आव्हानांना त्यांनी आपल्या विचारातून प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. या वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयातील कुमारी माहेश्वरी वारे प्रथम, कुमारी किरण जाधव द्वितीय, तर महक शेख व निकिता कोरपेलवार या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून प्रा.तेलंग व प्रा. सचिन शिंदे यांनी भुमिका बजावली. या क्षणी महाविद्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश खेडेकर यांनी केले. आभार प्रा. करण राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता महाविद्यालयातील प्रा. साबळे प्रा. ताडाम, प्रा. सदुलवार, प्रा. रहाटे, श्री. नळे, मेश्राम, श्रीमती सगुना बिरादर, नीलिमा मोहितकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here