By : Shankar Tadas
कोरपना (नांदा )
: कोरपना तालुक्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथे जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारे हे देखील उपस्थित होते.
चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटर व प्रसूती कक्ष चे उद्घाटन करण्यात आले. या भेटीदरम्यान, आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्यविषयक कामांचा आढावा घेण्यात आला आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कोरपना पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम, गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी, नांदा ग्रामपंचायतच्या सरपंच मेघा पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नांदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत शेंडे, डॉ. चंदनखेडे, पूजा दांडेकर आणि आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, आशा सुपरवायझर व आशा सेविका देखील यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी विवेक जॉन्सन यांनी आरोग्य केंद्रातील विविध सुविधा आणि स्वच्छता यांविषयी पाहणी करून समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये अधिक उत्साह संचारला असून, रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी ते तत्पर आहेत.