By : Shankar Tadas
कोरपना (नांदा) : गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे कार्यरत डॉ. प्रा. राजेश सुधाकर डोंगरे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अभ्यास मंडळ सदस्य (व्यावसायिक अर्थशास्त्र) यांना लिखाणाचे भरीव कामगिरी साठी तसेच त्यांच्या विवेक पूर्ण आणि अभ्यासू लिखाणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेमार्फत उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
वाणिज्य या विद्याशाखे अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक या पाचही विद्यापीठांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे लिखाण झाले आहे. आज पर्यंत डॉक्टर राजेश डोंगरे यांचे ४७ पुस्तके प्रकाशित झाली आहे. तसेच संशोधन क्षेत्रात पण विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर एकूण ५१ विविध विषयावर संशोधन लेख प्रकाशित झालेले आहे. त्याच पद्धतीने प्राध्यापक डॉ. राजेश डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीसाठी विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहे. शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी समजली जाणारी आचार्य पदवीचे मूल्यमापन करण्यासाठी आचार्य पदवीसाठी सादर करण्यात येणाऱ्या प्रबंधाचे मूल्यमापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाच्या पॅनलवर डॉ. राजेश डोंगरे यांनी काम बजावले आहे.
सर्व स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Home गडचांदूर / कोरपणा डॉ. राजेश डोंगरे यांना महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचा उत्कृष्ट लेखक पुरस्कार