शेतक-यांच्या प्रश्नांसाठी काॅग्रेस मैदानात : ३ मार्च ला चंद्रपूर येथे शेतकरी सन्मान धरणे आंदोलन

लोकदर्शन राजुरा : मोहन भारती
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि. ३ मार्च २०२५ ला सकाळी ठिक ११ वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे धरणे आंदोलन होणार आहे. केंद्र व राज्य सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी बांधव हा अकारण भरडला जात आहे. त्यामुळे कृषिप्रधान भारताचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार हे आंदोलन होत असल्याचे चंद्रपूर जिल्हा काॅग्रेस अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले.
या आंदोलनात दि. ३ मार्च २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमेटी तसेच काँग्रेसचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी तसेच मायबाप शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धरणे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस, जिल्हा शहर काँग्रेस, जिल्हातील सर्व तालुका काँग्रेस कमेटी तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here