डॉ.अलका देशमुख यांना महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचा जीवन गौरव सन्मान पुरस्कार

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा – प्रा. राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या महाविद्यालयात आयोजित 41 व्या महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेमध्ये या परिषदेच्या पूर्व संमेलनध्यक्ष, माजी प्राचार्या व रा.तू.म.नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या माजी अध्यक्षा ,ज्येष्ठ विचारवंत मार्गदर्शिका डॉ.अलका विनायकराव देशमुख यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल परिषदेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ.नितीन धांडे व महाराष्ट्राचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैलेंद्र देवलणकर व महाराष्ट्र राज्यशास्त्र परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. अलका विनायकराव देशमुख या विदर्भ राज्यशास्त्र परिषदेच्या अध्यक्ष असून त्यांची भारतीय लोकशाही,राजकीय विचारवंत, राजकीय व्यवस्था व तुलनात्मक अध्ययन अश्या विविध संकल्पना आणि विषयावरची 26 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. अलका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 32 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका या पुरस्कारासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ. अलका देशमुख यांनी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या प्राधिकरणावर कार्य केले असून त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या संशोधन व मान्यता समिती वर सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यांची नुकतीच गोंडवाना विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्रावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. परिषदेतर्फे मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल विदर्भ राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे सर्व पदाधिकारी,महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्रातील त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here