लोकदर्शन गडचांदूर👉 मोहन भारती
नागपुर ते मुंबई समृध्दी महामार्गाचा अंतिम टप्पा कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे,
सध्या नागपुर ते इगतपुरी पावतो समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरू आहे, इगतपुरी ते मुंबई पावतो च्या अंतिम टप्पा चे काम पुर्ण झाले आहे, फेब्रुवारी मध्ये अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे सांगीतले जाते आहे, तेव्हा लवकरात लवकर अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे, अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यास नागपूर ते मुंबई थेट प्रवास कमी वेळात पुर्ण करता येईल.
समृध्दी महामार्गावरील वाहतूक सध्या मोठया प्रमाणात सुरू आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
