लोकदर्शन 👉मोहन भारती
कोरपना :– कोरपना तालुक्यातील वनसडी येथील आदिवासी भवन येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली परसोडा – येरगव्हाण जिल्हा परिषद सर्कल काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी माजी आमदार सुभाष धोटे यांनी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी हरसंभव प्रयत्न करावे असे आवाहन केले, परिसरातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी जनता, निराधार, महिला भगिनी, विद्यार्थी अशा सर्व स्तरातील जनप्रश्नांची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहावे असे सांगितले.
यावेळी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष ललिता गेडाम, गणेश गोडे, सरपंच मंगला आत्राम, रोशन अस्वले, दीपक खेकारे, रोशन मरापे, विलास मडावी, राजू ठाकरे, राहुल मालेकर, राहुल गाडगे, तुळशीदास टेकाम, भास्कर जोगी, राजाबाबू गळगट, इरफान शेख, रसूल पटेल, आनंदराव मोहूर्ले, श्रीराम आत्राम ,विलास आडे, यादव दरणे, उत्तम आत्राम, हरिदास वळसकर, विनोद नवले, सुनिल कोहचाडे यासह कोरपना काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.