लोकदर्शन उरण👉गुरुनाथ तिरपणकर
२६जानेवारी२५ची पहाट,सूर्यानारायणाचा प्रखर तेज,पक्षांचा किलबिलाट आणि भारतवासियांचा भारत मातेचा जयघोष संपूर्ण देशात घुमत होता.सर्वत्र उत्साही वातावरण,अशाच प्रसंन्न सकाळी उत्साही वातावरणात प्रजापती म्यॅगनम वसाहतीत,द्रोणागिरी,उरण येथे सुरक्षा रक्षकांची परेड आणि भारतमातेच्या जयघोषात अवघा परिसर दुमदूमला होता.श्री.अनिस मूकरी जेष्ठ रहिवाशी यांच्या हस्ते झेंडावंदन करुन धर्मनिरपेक्षतेचा संदेश जनतेला देण्यात आला.लहान थोरांनी तिरंग्याला सलामी देऊन स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली.राष्ट्रीय गीत,मान्यवरांची भाषणे युवा पिढीचे शूरगीते आणि बाल भाषणे असा प्रजासत्ताक दिन सर्व रहिवाशीयांनी एकतेने साजरा केला.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.