लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दि.24जानेवारी शुक्रवार रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंद नगरीचे आयोजन विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते.या आनंद नगरीचे उदघाटन वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ज्ञानदिप विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे,बि.व्हि.बुधवंत,एम.एस.गिरी,डि.आर.नाईकनवरे,आर.बि.राठोड, श्रीमती जि.आर.मळी, श्रीमती एस.आर.सोनवणे, श्रीमती जे.बि.शिंदे,जि.एम.कावळे,व्हि.एन.बोंडे उपस्थित होते.यावेळी विद्यालयाच्या परीसरात भरलेल्या या आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल विक्रीसाठी ठेवले होते.विदयार्थ्यांच्या या स्टाॅलला मुख्याध्यापक एस.डि.भोकरे, मुख्याध्यापक भागवत मोरे,व विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी भेट देऊन विविध प्रकारचे अन्न पदार्थ खरीदि करुन उत्साहाने आनंद नगरी मध्ये विद्यार्थ्यांकडुन खरेदी करून ताव मारला.यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या आनंद मेळाव्याने परीसर दुमदुमला होता.या आनंद मेळाव्याच्या यशस्वितेसाठी उमाकांत क्षीरसागर, बळीराम शेंबडे, कैलास राऊत, विष्णु पंडित, नारायण आष्टकर आदिंनी परीश्रम घेतले.