लोकदर्शन वालुर 👉महादेव गिरी
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदिप विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे,बि.व्हि.बुधवंत,जि.एम.कावळे, प्रविण क्षीरसागर, एम.एस.गिरी,व्हि.एन.बोंडे,श्रीमती जि.आर.मळी,एस.आर.सोनवणे,जे.बि.शिंदे,डि.आर.नाईकनवरे,बि.पि.मोरे,आर.बि.राठोड आदी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.यावेळी ज्ञानदिप विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे, जि.एम.कावळे,एम.एस.गिरी,बि.व्हि.बुधवंत,डि.आर.नाईकनवरे,बि.पि.मगर प्रविण क्षीरसागर आदिंनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम.एस.गिरी यांनी केले तर आभार व्हि.एन.बोंडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाकांत क्षीरसागर, कैलास राऊत, बळीराम शेंबडे, विष्णु पंडित, नारायण आष्टकर आदिंनी परीश्रम घेतले.