By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्दच्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेची पालक सभा 11 जानेवारी रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी आमदार देवरावदादा भोंगळे यांना कॉल करून मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यावेळी आमदारांनी शाळेतील सुविधांची विचारपूस करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन यावेळी शिक्षकांना केले तसेच शाळेला शुभेच्छा दिल्या.
या पालक सभेला शिक्षण विस्तार अधिकारी जोगदंड सर, केंद्र प्रमुख मुसळे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोतीजी वडस्कर, सरपंच उमाजी आत्राम, उपसरपंच डॉ. विनायक डोहे, शाळा समिती उपाध्यक्ष धर्माजी कोटनाके, हनुमान देवस्थान कमेटीचे अध्यक्ष प्रमोद वराटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गजानन भोयर, गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक संजय लोहे सर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह समितीचे अध्यक्ष गोपाळ लांडे, पोलीस पाटील सविता लांडे यांच्या सह, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाषजी बेरड सर यांनी केले. यावेळी शाळेतील समस्याविषयी चर्चा करून त्या दूर करणे तसेच तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आपल्या गावात आयोजित करण्यावर विचारविमर्ष करण्यात आला. सभेच्या आयोजनाकरिता विषय शिक्षिका लोभा जिवने, विषय शिक्षिका मंगला उरकुडे, शिक्षक देवराव बोबडे, दयाशंकर खैरे, सुनील दुर्गे, संतोष पाल या शिक्षक वृंदाने परिश्रम घेतले.