लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा. गजानन राऊत
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स,गडचांदूर या महाविद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न .
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस, गडचांदूर येथे पालक शिक्षक सभा आयोजित करण्यात अली.कार्यक्रमाची अध्यक्षता डॉ. शैलेंद्र देव सर यांनी केली मा. श्री विठ्ठलरावजी थिपे, उपाध्यक्ष, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून हजर होते. सभेचे आयोजन गणित विभागाचे प्रमुख व पालक शिक्षक सिमितीचे समन्वयक डॉ. अजय कुमार शर्मा यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. मनोहर बांदरे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उद्देशावर चालण्यासाठी प्रेरित करण्यात आले. सभेकरिता बहुसंख्य पालक उपस्थित होते. पालक, शिक्षक, विद्यार्थी, संस्था मिळून ज्ञान घेण्याची प्रक्रिया पूर्ण होते त्यामुळे पालक यांनीसुद्धा ज्ञानप्रक्रियेत आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.
सभेचे आभार प्रदर्शन प्रा. चेतन वैद्य यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. रामकृष्ण पटले, प्रा. चेतन वानखेडे प्रा. उत्कर्ष मून, प्रा. तसेच कु. शबाना,श्री. गोरे, श्री शेरकी, श्री करमनकर , श्री. पोटे,श्री. पिंपळकर,श्री. खोब्रागडे,श्री मांडवकर श्री मेश्राम,श्री दुबे,व श्री मेंढी, हे शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी हजर होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.