By : Shankar Tadas
कोरपना – “प्रत्येकाला आयुष्यात काही संधी मिळतात, परंतु त्या संधीचे चीज करणे किंवा त्याचा उपयोग करून घेणे आपल्या हातात असते. त्यामुळे प्रत्येक संधीचे सोनं करा आणि यशाचा मार्ग स्वतः तयार करा,” असे प्रतिपादन लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांनी केले. ते कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून सचिव भाऊराव कारेकर, उपाध्यक्ष रमाकांत मालेकर, सहसचिव अरुण कुकडे, संचालक गणेश गोडे, विलास बोरडे, सुभाष जोगी, अरविंद कारेकर, जिल्हा बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक अनिल रेगुंडवार, सेवानिवृत्त प्राचार्य डी. जी. खडसे, ज्येष्ठ शिक्षक नारायण हजारे, डी. डी. बोरडे, मारोती टेंभुर्डे, आर. एस. पाचभाई, उईके ,हरीभाऊ डोहे विद्यालय मुख्याध्यापक हेपट, प्रियदर्शनी विद्यालय, पारडीच्या मुख्याध्यापिका सीमा मालेकर,
शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष जयराम टेकाम, सखी सावित्री समिती समुपदेशक ज्योती रेगूंडवार,येलपुलवार, आशा टेंभुर्डे , हेपट, पाचभाई, तुळशीराम डोहे , तोडासे , दादाजी तुरानकर ,जयंत जेनेकर, मनोज गोरे,
वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य पी बी बोंडे, पर्यवेक्षक के डी घुघुल आदी प्रामुख्याने उपस्थित होते
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी. बी. बोंडे यांनी केले. संचालन गणेश गोडे यांनी, तर आभार प्रदर्शन के. डी. घुघुल यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले, ज्यामुळे उपस्थित मान्यवर व पालकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.