By : Nitesh Shende
बिबी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनी ३ जानेवारी २०२५ ला कोरपणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र नांदाफाटा येथे राज्यस्तरीय NQAS समितीने मूल्यमापन करण्याकरिती भेट दिली. त्यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पारंपारिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवाजी कॉन्व्हेंट नांदा येथील मुलींनी स्वागत नृत्य सादर केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संकेत शेंडे यांनी पावर पॉइंट च्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती दिली.
राज्यस्तरीय समितीने ओपनिंग मीटिंग घेत मूल्यमापनाला सुरुवात करण्यात आली.त्यामध्ये संपूर्ण इमारतीची तथा रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची आतून व बाहेरून पाहणी करण्यात आली. प्रत्येक कक्षाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर तीन-तीन विषय वाटून घेऊन संपूर्ण दिवस नांदा येथे राज्यस्तरीय तपासनी समितीकडून कडून आरोग्यकेंद्राचे मूल्यमापन करण्यात आले.
सदर राज्यस्तरीय समितीमध्ये अकोला येथील जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा तथा यवतमाळ जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संघर्ष राठोड क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथील जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजगोपाल मॅडम यांचा समावेश होता. सोबतच कोरपना व जिवतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे, नांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप हे सुद्धा उपस्थित होते.
मागील दोन महिन्यांपासून तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेंभे यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत शेंडे, डॉ. अनघा पाटील, आरोग्य सहाय्यक स्त्री व पुरुष,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सामुदायिक आरोग्य अधिकारी , औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, सफाई कामगार, वाहनचालक परिचर, आशा गटप्रवर्तक,आशा वर्कर यांनी घेतलेल्या परिश्रमाचे राज्यस्तरीय समिती कडून अभिनंदन करताना आरोग्य केंद्राचा प्रगतीवर समाधान व्यक्त करीत क्लोजिंग मिटिंग घेऊन त्यांना आढळलेल्या त्रुटीची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना देत त्यांची पूर्तता करण्याचा सूचना दिल्या.