लोकदर्शन👉 मोहन भारती
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, अधिसभेची (सिनेट) सुरुवात वन्देमात्रम या राष्ट्र गाणाने तसेच विद्यापीठगीत व राज्यगीताने विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) कामकाजाचा प्रारंभ व्हावा. तसेच राष्ट्रगीताने समारोप करावा. या विषयाच्या अनुषंगाने दिनांक १४ मार्च २०२४ रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिसभेत विद्यापीठ विकास मंचाचे व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावावर चर्चा करून एकमताने सभागृहात मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात अधिसभा (सिनेट) ची सुरुवात वन्देमात्रम या राष्ट्रगाणाने व विद्यापीठ गिताने होते. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या प्रथम अधिसभेचे गठन जानेवारी २०१८ ला झाले तेव्हापासूनच अधिसभेची सुरुवात वन्देमात्रम या राष्ट्रगाणाने व्हायला पाहिजे होते. परतू संविधानिक परंपरांच पालन केल्या गेले नाही. संसद, विधिमंडळाच्या कामकाजाची सुरुवात वन्देमात्रम या राष्ट्रगाणाने होत असतांना, मात्र विद्यापीठात संविधानिक परंपरांचे पालन केल्या जात नव्हते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या उद्देशिका कलम ४ पोट कलम (४ व १२) नुसार राष्ट्रीय मुल्यांची जोपासना, सांस्कृतीक वारसा जतन करणे .विभिन्न धर्म आणि संस्कृती यांच्या प्रती आदर वृद्धिगंत करणे . हे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, नुसार विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्टे आहेत. राष्ट्रगान, राष्ट्रगीत,राज्यगीत व विद्यापीठगीत यांचा सन्मान करुन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगंत होण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या उद्दिष्टांची अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मूल्ये याची जपणूक करणे ही विद्यापीठठाची जबाबदारी आहे.असे प्रस्ताव सादर करतांना प्रस्तावक व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी सभागृहात भुमिका मांडली.
सदर प्रस्ताव गुरुदास कामडी यांनी अधिसभा सभागृहात सादर केला. सदर प्रस्तावास प्रशांत दोंतुलवार यांनी अनुमोदन दिले. चर्चेअंती सदर प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या अधिसभेचा प्रारंभ अखेर वन्देमातरम या राष्ट्र गाणाने झाला. याबद्दल प्रस्तावक गुरुदास कामडी यांनी विद्यापीठाचे मा.कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे,व विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे.
.