पेसा ग्रामसभा समृद्ध व्हावी : विकास राचेलवार

By : Shankar Tadas
कोरपना : पेसा कायदा हा आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या विकासासाठी प्रभावी माध्यम आहे. ग्रामसभा सक्षम झाली तर गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल. पेसा कायद्याचे महत्व स्पष्ट करताना ग्रामसभेला सबळ करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार केले.

कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथे पेसा दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती कोरपनाचे गटविकास अधिकारी विजय पेंदाम, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच माधुरी टेकाम, प्रमुख अतिथी उपसरपंच आशिष देरकर, अल्ट्राटेक सिमेंट वेल्फेअर फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रतीक वानखेडे, बिबीचे पोलीस पाटील राहुल आसुटकर, आसनचे पोलीस पाटील प्रवीण आडे, पेसा जिल्हा व्यवस्थापक मनीष गणवीर, तालुका व्यवस्थापक पंकज साखरकर, विस्तार अधिकारी पंढरीनाथ गेडाम, प्रशांत दुर्योधन, ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे, मुख्याध्यापक अनंत रासेकर, उन्मेदचे तालुका व्यवस्थापक भगत यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी ग्रामस्थांना पेसा कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून उपसरपंच आशिष देरकर यांनी ठक्कर बाप्पा आदिवासी उपयोजना शबरी आदिवासी घरकुल योजना तसेच वैयक्तिक लाभांच्या योजना मंजूर करण्याची मागणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचेलवार यांच्याकडे केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *