परभणीच्या घटनेचे गडचांदुरात पडसाद, काढला भव्य कॅण्डल मार्च

परभणीच्या घटनेचे गडचांदुरात पडसाद, काढला भव्य कॅण्डल मार्च

लोकदर्शनं गडचांदूर 👉अशोककुमार भगत

गडचांदूर दिनांक 20 डिसेंबर परभणी येथे संविधान शिल्पाची तोडफोडीच्या घटनेनंतर उसळलेल्या उद्रेकात दगडफेक व तोडफोड केल्याप्रकरणी काही भीमसैनिकांना पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. यात सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या आंबेडकरवादी युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.

या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी २० डिसेंबर रोजी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने गडचांदुर ता. कोरपना जि चंद्रपूर येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करीत या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच सूर्यवंशी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

गडचांदुर शहरातून हा भव्य कॅन्डल मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून सिद्धार्थ विहार मार्गे संविधान चौक बस स्थानक मार्गे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.
यावेळी सामाजिक चळवळीचे नेते प्रा. डॉ. हेमचंद दूधगवळी यांनी परभणी येथे पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराची सविस्तर घटना कथन केली.

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येचा सर्वश्री दिव्यकुमार बोरकर, विश्वास विहिरे, मधुकर चूनारकर, रामदास बुरचुंडे, प्रा. प्रशांत खैरे, गजानन वाघमारे, रवि ताकसांडे, सौ. बेबीताई वाघमारे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. रोशन मेश्राम यांनी आपल्या मनोगतातून शासनाचा तीव्र निषेध करून सूर्यवंशी कुटुंबाला एक कोटीची आर्थिक मदत करून शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली. शेवटी बुद्ध वंदणेने कँडल मार्च ची सांगता करण्यात आली.
यावेळी महिला व भीमसैनिकांची मोठी उपस्थिती होती. संचालन प्रा. प्रशांत खैरे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *