लोकदर्शन नागपूरप्रतिनिधी.👉.गुरुनाथ तिरपणकर
नागपूर माहे मार्च२०२४मध्ये माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी असताना विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ जाहीर केले होते.त्या अनुषंगाने त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असताना विधानभवनामध्ये त्यांची शिष्टमंडळासह भेट घेण्यात येऊन त्यांचा अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.सोबतच,विणकर आर्थिक विकास महामंडळ त्वरीत कार्यान्वित करण्याबाबत,आवश्यक असलेला अधिकारी आणि कर्मचारी वर्ग,विणकर मंडळास निधी उपलब्ध करून देणे,अध्यक्षासह अशासकीय सदस्यांची मंडळावर नेमणूक करणे इत्यादी मागण्या मंजूर होण्याबाबत लेखी निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली.एसबीसी संवर्गाच्या विविध समस्या बाबत सुध्दा आपण जातीने लक्ष केंद्रित करुन न्याय द्यावा अशी सुध्दा विनंती यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेबांना करण्यात आली.परभणी येथील माजी खासदार आदरणीय श्री.सुरेश दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्री.सतीश दाभाडे यांनी श्री.एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान केला.यावेळी परभणी येथील अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे राज्य खजिनदार श्री.विष्णू भाऊ कुटे,विदर्भ संघटक श्री.नरेंद्रजी माहुरे,विदर्भ उपाध्यक्ष श्री.विलास गोरख सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस श्री.विष्णुपंत रोकडे,नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.रवी भाऊ जुमले इत्यादी उपस्थित होते.भेटीच्या प्रसंगी आदरणीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी समाजाच्या सर्व समस्यांचे लवकरच निदान करण्यात येईल अशी खात्री यानिमित्ताने शिष्टमंडळास दिली.