लोकदर्शन गडचांदुर👉.अशोककुमार भगत
चंद्रपूर चे जिल्हाधिकारी व राजुरा उपविभागीय अधिकारी यांना परसोडा ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.यात ग्रामपंचायत परसोडा अंतर्गत येणाऱ्या मौजा परसोडा, परसोडा नवीन, कोठोडा खु, रायपूर, गोविंदपूर, व कोठोडा खू या गावांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे डांबरीकरण व अंतर्गत विकासाच्या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले.
गावांमधील ग्रामीण रस्ता क्रमांक 1 चे डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. बिर्ला ग्रुप अंतर्गत आरसीसीपीएल सिमेंट कंपनी मुकुटबन, जिल्हा यवतमाळ यांनी आधीच काही रस्त्यांचे बांधकाम केले आहे. मात्र, अद्याप उर्वरित 3.5 किमी रस्ता आणि मौजा कोठोडा खु परिसरातील 500 मीटर रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे.
ग्रामपंचायत परसोडा अंतर्गत रायपूर, कोठोडा खु, परसोडा नवीन, व गोविंदपूर गावातील सिमेंट काँक्रिट रस्ते व नाली बांधकामही तातडीने करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
हा प्रकल्प सिमेंट कंपनीच्या सीएसआर (CSR) निधीतून राबवण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
मौजा परसोडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिमेंट कंपनीने खरेदी केल्या असून, उत्खननासाठी रस्त्यांचा वापर केला जात आहे. या रस्त्यांचे व्यवस्थापन कंपनीमार्फत करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
निवेदन सादर करताना
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, परसोडा च्या सरपंच
गिरजाताई रामभाऊ कोहचाडे,
उपसरपंच सतीश गोंलावार,
शालिक दूर्लावार, गणेश मडावी,
सुमित्रा अरुण कुंठावार, ज्योती सदाशिव तलांडे,संदीप मडावी, सदाशिव तलांडे, दनियाल येमुर्लेवार आदी उपस्थित होते
ग्रामपंचायतीच्या या मागणीवर संबंधित विभागांनी त्वरीत निर्णय घ्यावा, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.