लोकदर्शन यवतमाळ(प्रतिनिधी-👉गुरुनाथ तिरपणकर
महाराष्ट्रातील सर्व जिल्हे,तसेच इतर राज्ये आणि बाह्य देशातील तमाम कोष्टी समाज व पोट-जातीच्या समाज बांधवांना कळविण्यात आनंद होत आहे कि,यावर्षी यवतमाळ येथे कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दि.२९डिसेंबर२०२४रोजी सकाळी११वाजता भव्य वधु-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन उत्सव मंगल कार्यालय,अवधूत वाडी,दत्त चौक,यवतमाळ या ठिकाणी केले आहे.या वधु-वर महामेळाव्यात सहभागी होणा-या वधु-वरांची ऑनलाईन फाॅर्म देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.यात महाराष्ट्रातील सर्व गावे,जिल्हे,इतर राज्ये व बाहेर देशातील अशा सर्व समाज बांधवांनी खुल्या भावनेने वधु-वरांनी मोठ्या संख्येने नोंदणी करुन सहभाग घ्यावा.असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.नोंदणी फी फक्त५००/-(पाचशे रुपये फक्त)अशी माफक ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रविंद्र केशवराव खोडवे- ९६३७९०७२२०,उपाध्यक्ष-अरुण खाटले९१७५५४४८७४,सचिव-गिरीश प्रकाशराव झंझाड९८२२५२२०३२यांच्याशी संपर्क साधावा.राज्यातील सर्व कोष्टी बांधवांनी एकत्र येऊन या राज्यस्तरिय महामेळाव्यास लक्षणीय बहुसंख्य वधु-वरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन महामेळावा यशस्वी करावा.असे आवाहन कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.