गुरुनाथ तिरपणकर यांना प्रेरणा फाऊंडेशनचा”राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार”प्रदान

लोकदर्शन बदलापूर 👉गुरुनाथ तिरपणकर

बदलापूर : समाजासाठी मणभर नाही तर कणभर द्यावे,या उक्ती प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार गुरुनाथ तिरपणकर सेवाभावी कार्यात कार्यरत आहेत.पत्रकार संघटना,वृत्तपत्र लेखक संघ यावरही ते कार्यरत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी यांनी घेतली.आणि नुकताच त्यांना बदलापूर येथील बल्लाळेश्वर मंगल कार्यालयात आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात”राज्यस्तरिय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार”प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.गुरुनाथ तिरपणकर हे जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,पुरस्कार वितरण सोहळा,वैद्यकीय अशा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत.गुरुनाथ तिरपणकर हे सिटीझन वेलफेअर असोशिएशन,कोष्टी व्हीजन ट्रस्ट,अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषद,देवांग कोष्टी समाज मंडळ डोंबिवली,रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळ बदलापूर,रेल्वे प्रवासी संघटना बदलापूर,उत्कर्ष सेवा मंडळ बदलापूर,महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ,पत्रकार उत्कर्ष समिती अशा संस्थांनवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.तसेच गुरुनाथ तिरपणकर हे पाक्षिक-दीपस्तंभ,सिने न्यूज रिपोर्टर-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,प्रतिनिधी-दै.झुंजार केसरी,सा.इंडिया सम्राट,सदस्य-मुंबई मराठी पत्रकार संघ,उपसंपादक-सा.आवाज कोकणचा,प्रतिनिधी-दै.महाराष्ट्र जीत यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी व सचिव वैभव कुलकर्णी यांचे मनस्वी आभार व्यक्त केले आहेत.गुरुनाथ तिरपणकर यांना हा”राज्यस्तरिय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार”मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here