माथरा येथे शंकरपटाचे उदघाटन

By : Shankar Tadas
राजुरा : तालुक्यातील मौजा माथरा येथे गावकऱ्यांच्या सहयोगातून आयोजित भव्य जंगी इनामी शंकरपटाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात आमदार देवरावदादा भोंगळे यांनी उपस्थित राहून जमलेल्या शेतकरी बांधवांच्या आनंदात सहभागी घेतला.

शंकरपटाचा आनंद काही औरच असते; त्याची अनुभूती आज छकडा हाकताना आली. या भागात शेती व शेतकरी यांच्या हितासाठी काम करण्यावर माझं भर राहील यासोबतच येत्या काळात याच भागात राज्यस्तरीय शंकरपटाचे आयोजनही आपण करू, असा विश्वास याठिकाणी बोलतांना आमदार भोंगळे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे, माथऱ्याचे सरपंच हरिदास झाडे, प्रशांत गुंडावार, अतुल चहारे, किशोर पंदिलवार, अर्जुन पायपरे, दिनेश ढेंगळे, वामन चहारे, गणपती झाडे, महादेव ताजणे, दादाजी चहारे, अजय चहारे, अनिल डाखरे, देविदास वांढरे, वैभव लांडे यांचेसह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here