लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना :- आमदार सुभाष धोटे हे विकासाचे व्हिजन असणारे लोकप्रतिनिधी आहे. कोट्यवधींचा निधी खेचून आणण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असून क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत केले.
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथील नथ्थू कॉलनी पटांगणावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार सुभाष धोटे यांच्या निवडणूक प्रचाराकरिता भव्य जाहीर सभा पार पडली. उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कठोर परिश्रमातून निर्माण झालेल्या भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या, लाडकी बहिण योजनेच्या मदत निधीवरून महिलांना धमकावणाऱ्या महायुतीला मतदार बंधू भगिनी त्यांचे उमेदवार पाडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देत धडा शिकविण्याचे आणि राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनुभवी आणि विविध विकासकामातून क्षेत्रातील जनसामान्यांचे जिवन सुखी, समृध्द करणारे सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. वामनराव चटक पंधरा वर्षे या क्षेत्राचे आमदार होते. मात्र क्षेत्राचा कोणताही विकास करण्यात ते यशस्वी ठरू शकले नाही. महाराष्ट्र विधानसभा सभागृहात पुन्हा येणार नाही अशी शपथ घेणारे चटप पुन्हा विधानसभा निवडणुकीत उभे आहे. मात्र यावेळी पुन्हा ते विधानसभेत जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
यावेळी प्रज्योत वरारकर, राहुल वाढई, अर्जुन कोडापे, रूद्राक्ष खोब्रागडे, गौतम कांबळे यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. ना. वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन सर्वांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.
या प्रसंगी काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार संपत कुमार, अनुपम जी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, राष्ट्रवादी (श. प.) चे अरुणभाऊ निमजे, शिवसेना (उभाठा) चे अंकुश धाबेकर , काँग्रेसचे विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, स्वामी येरोलवार, नगराध्यक्षा सविता टेकाम, अँड. अरूण धोटे, आशाताई खासरे, अशोक बावणे, संभाजी कोवे, पाप्पया पोन्नमवार, श्यामसुंदर राऊत, महेश जुमनाके, अभय मुनोत, शैलेश लोखंडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले.