जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सिंदखेड राजा मतदान सिलिंग केंद्राला दिली भेट

लोकदर्शन देऊळगाव राजा 👉 प्रा. अशोक डोईफोडे
मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 12 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर 2024 रोजी ई. व्ही. एम. आणि व्ही. व्ही. पॅट मशीन सिलिंग करण्याचे काम आजपासून सुरु झाले आहे.

मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुलडाणा डॉ. किरण पाटील यांनी आज 24 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघ येथे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान यंत्र सिलिंग केंद्राला आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी भेट दिली. आजच्या या भेटीदरम्यान श्री. पाटील यांनी सिंदखेड राजा येथील ई. व्ही. एम. सिलिंगच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच महत्वपूर्वक मार्गदर्शक केले.

24- सिंदखेड राजा मतदारसंघ आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे, बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदाराची नोंद झाली असून, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच्या साठीची लागणारी तयारीबाबतचा आढावा मा.जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. किरण पाटील यांनी घेतला .

विधानसभा निवडणूक 2024 साठी सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये एकूण 340 मतदान केंद्र असून त्यासाठी एकूण 30 सिलिंग टीम पुढील 2 दिवस म्हणजेच 12 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण करणार आहेत. प्रत्येक टीम मध्ये एक झोनल अधिकारी, एक सहाय्यक झोनल अधिकारी, एक ग्राम महसूल अधिकारी, एक महसूल सेवक असे एकूण 4 कर्मचारी -अधिकारी काम करत आहेत त्यातील टीम क्रमांक 20 मध्ये सुरज जगदाळे, आशिष शिंदे, डी.एच. दांडगे,एस. एन. पवार हे चार अधिकारी कर्मचारी काम करत आहेत.

मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सिंदखेडराजा येथील ई. व्ही. एम. सुरक्षा कक्षाला (strong Room) ला भेट देली तसेच सर्व व्यवस्थाची पाहणी करून कशाप्रकारे ई. व्ही. एम. ला सुरक्षा प्रदान केली जात आहे याची खातरजमा करून घेतली तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारी संबंधी समाधान व्यक्त केले तसेच सर्व टीमचे कौतुक केले.

आजपासून सुरु असलेल्या या ई.व्ही.एम. आणि व्ही. व्ही. पॅट मशीनचे सिलिंगचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम युद्धपातळीवर काम करत आहे आणि ई. व्ही. एम. आणि व्ही. व्ही. पॅट सिलिंग ची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत .त्यासाठी
मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिंदखेडराजा श्री. अजित दिवटे , मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती वैशाली डोंगरजाळ, मा.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी सिंदखेड राजा श्री मुकेश माहोर ,मा. मुख्याधिकारी सिंदखेड राजा श्री प्रशांत व्हटकर, मा. निवडणूक नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री. मनोज सातव,मा.निवडणूक नायब तहसीलदार देऊळगाव राजा श्री प्रवीण घोटकर, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा डॉ.अस्मा मुजावर ,मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा डॉ. प्रवीणकुमार वराडे, मा. नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव, मा. नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रांजल पवार, मा.प्र. नायब तहसीलदार श्री. नितीन बढे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी श्री. अंकुश म्हस्के, संजय सोनुने तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग प्रयत्न करत आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *