मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे दोन दिवसीय प्रशिक्षण सुरू ,,,,,,,,,,,,,

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे दोन दिवसीय प्रशिक्षण सुरू
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 8 नोव्हेंबर 2024 व 9 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा येथे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.खडसे यांच्या आणि सौ. निता संजय खडसे यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केलेले निवडणुकीच्या गीताने आजच्या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली. आनंद मय वातावरणात आजचे पहिल्या दिवसाचे प्रशिक्षण पार पडले.

प्रशिक्षण दरम्यान भारत निवडणूक आयोग यांची कायदे,तरतुदी आणि अद्ययावत सूचना यांची माहिती सांगण्यात आली. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली, टपाली मतपत्रिका व निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र अर्ज व नमुने यांचा अहवाल भरणे बाबत माहिती सांगण्यात आली. मतदान संकलन केंद्रावर ईव्हीएम तसेच मतदान साहित्य ताब्यात घेणे,सूचीनुसार साहित्य तपासणी करणे, ईव्हीएम तपासणी करणे, टपाली मतपत्रिका घेतली असेल तर स्वतःचे मतदान करून घेणे याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली. मतदानापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याबद्दल प्रा.खडसे यांनी सांगितले कि, मतदान केंद्र उभारणी करणे,अभीरूप (मॉकपोल) मतदान घेणे, कंट्रोल युनिट मधून अभिरुप मतदान नष्ट करणे, VVPAT मधील अभिरूप मतदान चिट्ठया करणे सील करणे याबद्दलची दक्षता घेतली पाहिजे यावर खडसे यांनी भर दिला. प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वीची कामे कशाप्रकारे पार पडली पाहिजे आणि त्याची दक्षता कशी घेतली पाहिजे याबद्दल प्रा. खडसे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टीं सांगितल्या, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करताना मतदान अधिकारी यांनी त्यांची कामे कशाप्रकारे पार पडली पाहिजेत तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रसंगी करावयाचे कार्यवाही याबद्दल त्यांना माहिती सांगण्यात आली.

EVM मशीनच्या वापराबद्दल आणि त्याच्या हाताळणी बद्दल ईव्हीएम प्रशिक्षण कक्षाचे नोडल अधिकारी उद्धव मांटे आणि सहाय्यक नोडल अधिकारी शिवानंद वाकदकर, सुशील शिलवंत यांनी सर्व मतदान अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. मतदानादरम्यान मतांच्या गोपनियते बाबत माहिती देणे,मतदान सुरू केल्याची घोषणा करणे, मतदान केंद्राध्यक्ष यांनी दैनंदिनी मध्ये घटनांची नोंद घेणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतदान स्थिती आकडेवारी कळविणे इत्यादी गोष्टी मतदानादरम्यान करायला पाहिजे याबद्दल सरांनी मुद्देसूद माहिती दिली.

सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना मास्टर ट्रेनर द्वारे प्रत्यक्षपने प्रात्यक्षिक करून ईव्हीएम मशीन कसे हाताळायाचे याचे प्रशिक्षण देण्यात आले, त्या प्रात्यक्षिक कक्षाची पाहणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश माहोर यांनी केली, सोबत नायब तहसीलदार सायली जाधव, सहायक नोडल अधिकारी प्रसारमाध्यम प्रकाश शिंदे, मतदान अधिकारी श्रीकांत बुलबुले, पी. जे. दंदाळे उपस्थित होते.

या दोन दिवसाच्या प्रशिक्षणा दरम्यान आज पहिल्या दिवशी मतदान अधिकारी, झोनल अधिकारी,मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण देण्यात आले, सोबत निवडणूक साहित्य स्वीकृती व तपासणी बाबत मार्गदर्शन सूचना करण्यात आले, मतदानाच्या एक दिवस अगोदरची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी कशाप्रकारे असायला हवी याबद्दल काही सूचना प्रा. खडसे यांनी दिल्या आहेत. आजचे प्रशिक्षण खूप आनंददायी वातावरणात पार पडले,जवळपास एकूण 800 अधिकारी कर्मचारी यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. दुपारी प्रशिक्षणामधील सर्व प्रशिक्षणार्थीना जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती.

या दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, गट विकास अधिकारी सिंदखेड राजा मुकेश माहोर,निवडणूक नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव, निवडणूक नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रवीण घोटकर,नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव, नोडल अधिकारी श्री गावंडे, प्रसार व प्रचार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के, संजय सोनुने तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *