सिंदखेड राजा मतदार संघामध्ये टपाल व्यवस्थापन टीम कार्यरत ,,,,,,,,,,,,.

लोकदर्शन देऊळगाव राजा 👉 प्रा अशोक डोईफोडे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,
मा. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने 24 – सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्य पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या टीम काम करत आहे त्यातील एक टीम आहे टपाल व्यवस्थापन टीम.

कोणत्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा घटक असतो किंबहुना तो या सर्व प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो. कोणताही शासकीय कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्या कर्मचाऱ्यांचे मतदान करून घेण्यासाठी टपाल व्यवस्थापन टीम काम करत असते.

24- सिंदखेड राजा मतदार संघात मा. मुख्याधिकारी नगर परिषद देऊळगाव राजा तथा नोडल अधिकारी टपाल व्यवस्थापन टीम श्री अरुण मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नोडल अधिकारी श्री चक्रधर खेर्डे, सहायक नोडल अधिकारी प्रांजल पवार, सहायक नोडल अधिकारी श्री सय्यद नजीर सय्यद रजाक यांच्या नियोजनाखाली काम करत आहे.

टपाली मतपत्रिका व्यवस्थापन टीम पुढील कामे करत आहे,
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांचेकडून टपाल मतपत्रिका करिता अर्ज स्वीकारणे,
निवडणूक कार्य प्रमाणपत्रा बाबतचे अर्ज घेणे,
टपाली मतपत्रिका पोस्टात लेखा अकाउंट उघडणे,
टपाली मतपत्रिका तयार करणे व पाठविणे, संकलित करणे,
चिन्हांकित मतदान यादी तयार करणे व साहित्य वितरित करण्याच्या दिवशी मतदान केंद्र निहाय वितरित करणे,
85+ मतदारांचे घरोघरी जाऊन मतदान करून घेणे बाबत प्रक्रिया राबविणे तसेच त्याबाबतचे अहवाल तयार करणे
इत्यादी महत्त्वाचे कामे टपाल व्यवस्थापन टीमच्या माध्यमातून पूर्ण होत असतात.

हे सर्व कामे पूर्ण करण्याची महत्वाची जबाबदारी विविध कर्मचाऱ्यांवर दिली आहे, त्यामध्ये गणेश नारायण मुळे , दीपक गोरे , बाबासाहेब गादेवाड , सुनील बोर्डे , के. बी. लहाने, श्रीमती. आर. आर. भंडारी, श्रीमती एस. बी रोकडे , अंकित बेलोकार, अमोल लोखंडे , हिरामन बागूल, श्रीमती पी. व्ही. इंगळे , श्रीमती लहाने मॅडम, वर्षा पडघान, श्रीमती ज्योती उरफाटे , एस. जी. पांडव, बी. बी. साळवे, आर. आर. लांडगे, श्री. पैठणे , श्री. ढाकणे, अमोल जाधव, गणेश देशमुख इत्यादी सर्व कर्मचारी अधिकारी आपले काम योग्यरित्या पार पाडत आहेत.

मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे तसेच मा. तहसीलदार सिंदखेडराजा अजित दिवटे, मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा. गटविकास अधिकारी सिंदखेड राजा मुकेश माहोर, मा. निवडणुक नायब तहसीलदार मनोज सातव, मा. निवडणुक नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रवीण घोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम काम करत आहे
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *