.निवडणूक निरीक्षक नरेश झा यांनी सिंदखेड राजा मतदार संघाचा घेतला आढावा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मा. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने 24 – सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सर्व झोनल अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांची आज दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी आढावा बैठक पंचायत समिती सभागृह सिंदखेडराजा येथे मा.सामान्य निवडणूक निरीक्षक नरेश झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आजच्या बैठकीमध्ये नरेश झा यांनी विधानसभा निवडणुकीच्या सर्व बाबींचा आढावा बैठकीमध्ये घेतला. प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून, विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी जमलेल्या सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विधानसभा निवडणूक 2024 ही यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी असे नरेश झा यांनी सर्वांना आवाहन केले.

निवडणूकिसाठी लागणारे साहित्य तसेच पोलिंग बूथ वर लागणारे साहित्य या सर्वांचा आढावा घेऊन कोणतेही साहित्य कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित सेल च्या अधिकारी यांना करण्यात आल्या.

नरेश झा यांनी आचारसंहितेचे पालन करताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, सर्व निवडणुकीतील कर्मचारी / अधिकाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता घेण्याचे सुद्धा सर्वांना आवाहन केले तसेच आचारसंहितेचे पालन करून योग्य प्रकारे आपापली कामे कशी करावी यासाठी मार्गदर्शन केले.
विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्याचे आवाहन केले.

आज दुपारी 3 वाजता निवडणूक विभाग तहसील कार्यालय येथे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले, यासाठी उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दुपारी 4 वाजता मा.सामान्य निवडणूक निरीक्षक नरेश झा सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेच्या सर्व बाबींची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सर्व उपस्थित उमेदवारांना ईव्हीएम मशीची तोंड ओळख करून दिली तसेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, VVPAT मशीन हे कशाप्रकारे काम करते याबद्दल उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.

मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी सर्व उमेदवारांना आज पासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काय करायला पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. मा. निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपये पर्यंत खर्च करण्याची मुभा दिलेली आहे, उमेदवारांनी त्यांनी केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवण्याकरिता त्यांना नोंदवही देण्यात आलेली आहे आणि या सर्व खर्चाचा ताळेबंद घेण्यासाठी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक यावर काम करत आहे.मा.निवडणूक खर्च निरीक्षक दानिश अब्दुल्ला हे दर तीन दिवसांनी या सर्व उमेदवारांच्या खर्चाचा आढावा घेतील.

आजच्या बैठकीला तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे ,तहसीलदार देऊळगाव राजा
वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश माहोर ,सामान्य निरीक्षक यांचे सहायक श्री ढगे, निवडणूक नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव , निवडणूक नायब तहसीलदार देऊळगावराजा प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा अस्मा मुजावर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव,नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रांजल पवार, प्र. नायब तहसीलदार नितीन बढे, EVM नोडल अधिकारी उद्धव मांटे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *