By : Aniket Durge
गडचांदूर ::
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे तसेच हात धुण्याचे फायदे कळावे यादृष्टीने १५ ऑक्टोबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा अंबुजा फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या एकूण २० शाळांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना बाल वयातच हात धुण्याचे महत्त्व समजले तर त्यांना भविष्यात चांगल्या सवयी लागतील हा विचार करून अंबुजा फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक हात धुवा दिन एकूण २० शाळांमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हात कसे धुवावे,त्याचे फायदे ,विद्यार्थांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन व विजेत्यांना बक्षिसे अंबुजा फाउंडेशन मार्फत देण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबुजा फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे यांच्या मार्गदर्शनात अंबुजा फाउंडेशनच्या शिक्षण विभागाच्या समन्वयिका सरोज अंबागडे यांच्या नेतृत्वात एकूण वीस गावातील पुस्तकपरी, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती,अंगणवाडी सेविका व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.