जामणी येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा जामनी येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जनसुविधा योजने अंतर्गत पुर्णत्वास आलेल्या ग्रामपंचायत भवन चे लोकार्पण कार्यक्रमाचे उद्घाटक आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. तसेच यावेळी त्यांनी जामनी आणि परिसरातील कावडगोंधी, गिरेगुडा, भेंडवी, लिंगागुडा, सालेगुडा, सोनापूर इत्यादी गावांना सदिच्छा भेट देऊन स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. जनतेचे प्रश्न जाणून घेत पुढे करावयाच्या विकासकामांचे नियोजन केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जगदीश किन्नाके, आदिवासी नेते माजी जि.प. सदस्य भीमराव माडावी, जेष्ठ काँग्रेस नेते हमीदभाई, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माजी जि. प. सदस्य नानाजी आदे, आदिवासी नेते श्यामराव कोटणाके, अनुसूचित जमाती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जंगु येडमे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, विस्तार अधिकारी रवींद्र रत्नपारखी, शुभाकांत शेरखी, दिलीप राऊत, पंकज उपासे, ग्रा. प. सदस्य शंकर परचाके, उज्वला झोडे, निर्मला मरस्कोले, अशोक कोटणाके, सुनिता गुरूनुले, बेबीनंदा कोटणाके यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *