By : उद्धव पुरी
गडचांदूर :
गडचांदूर येथे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स चे वतीने तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, व अल्ट्राटेक सिमेंट लि., माणिकगड सिमेंट वर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 ऑक्टोबर 24 ला दोन सत्रात राष्ट्रीय विज्ञान संमेलन अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या स्टाफ क्लब मध्ये आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे प्रथम सत्र सकाळी 10.30 ला सुरु होणार आहे तर द्वितीय सत्र दुपारी 4.30 वाजता सुरू होईल.
प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ अनिल चिताडे, संस्थेचे सचिव धनंजय गोरे, उज्वलाताई धोटे, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी चे युनिट हेड अतुल कन्सल, महेश गहलोत उपस्थित राहणार आहेत.
द्वितीय सत्राचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे उपकुलगुरू डॉ श्रीराम कावळे, संस्थेचे उपाध्यक्ष विकास भोजेकर, सदस्य राहुल बोढे, रामचंद्र सोनपितरे, डॉ रीना शिंदे यांचे सह शास्त्रज्ञ डॉ सुरेश उमरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ के पी राघवेंद्र यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या संमेलनात देशातील 150 मान्यवरांचा सहभाग होणार आहे. तरी जास्तीत जास्त विज्ञान प्रेमी प्राध्यापक, शिक्षक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदूर चे प्राचार्य तथा आयोजन समिती चे अध्यक्ष डॉ शैलेंद्र देव यांनी केले आहे.