शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ कोरपन्यात आक्रोश

By : Shankar Tadas

कोरपना :

कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कुल या शाळेत शिकणाऱ्या १२ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेला शिक्षक अमोल लोडे या नराधमाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आणि पिडीतेच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या या निच प्रवृत्तीच्या निषेधार्थ आज गुरुवारी  कोरपना शहरातून निघालेल्या भव्य निषेध आंदोलनात भाजपा व इतर पक्षाचे प्रमुख नेते तसेच सामान्य जनतेने सहभागी होऊन निषेध नोंदवला.

या निषेध मोर्चात आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यात शहरातील विविध पक्षाचे राजकीय नेते ,शाळेतील विद्यार्थी व नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.हा मोर्चा शहरातील जिल्हा परिषद शाळेपासून राजीव गांधी चौक , बस स्थानक मार्गे वणी रोड वरील हनुमान मंदिर परिसर पर्यंत काढण्यात आला. यानंतर निषेध सभा पार पडली.

शिक्षणासारख्या पवित्र शाखेला काळीमा फासून गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला गालबोट लावण्याचं पातक या अमोल लोडे नावाच्या नराधमाने केलं. त्याला तातडीने फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी आमची मागणी आहे. खरंतर हा नराधम शहर कॉंग्रेसच्या युवक विंगचा पदाधिकारी आहे; आणि आईबहिणींच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडविण्याचा कॉंग्रेसचा जुना डी.एन.ए. आहे. या प्रकरणातही या भागातील कॉंग्रेस नेत्यांनी पिडीतेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला. अलिकडेच घडलेल्या बदलापूर घटनेने तर कॉंग्रेस व मविआची दुट्टपी भुमिका चव्हाट्यावर आणली. या भागाचे आमदार सुभाष धोटे यांच्याही शिक्षण संस्थेत एका आदिवासी मुलीसंदर्भात असेच प्रकरण झाले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांनाही आता कॉंग्रेसची खरी मानसीकता कळून चुकली आहे. या संपूर्ण घटनेचा आम्ही तिव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो,  अशी भुमिका आंदोलनादरम्यान मांडली.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या प्रकरणात वेळीच लक्ष घालून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणाची कसुन चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्याकरता सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याचे आदेश दिले आहेत,  अशी माहिती ही यावेळी माध्यमांना दिली.

याप्रसंगी भाजपा राजुरा विधानसभा प्रमुख देवरावदादा भोंगळे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रदेश महिला मोर्चाच्या महामंत्री अल्काताई आत्राम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, भाजपचे शहराध्यक्ष अमोल आसेकर,  किशोर बावणे, नारायण हिवरकर, अरविंद डोहे, पुरुषोत्तम भोंगळे, प्रमोद कोडापे, विशाल गज्जलवार, नागोराव आत्राम, पद्माकर धगळी, ज्योतीराम मंगाम, धम्मकिर्ती कापसे, अनंता येरणे, धर्मराज वाघमारे, सतीश आत्राम, अशोक झाडे, दिनेश खडसे, सतीश जमदाडे, दिनेश ढेंगळे, ओम पवार, शैलेश परसूटकर यांचेसह मोठ्या संख्येने कोरपना वासियांची उपस्थिती होती. या निषेध मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) चे प्रदेश सचिव सय्यद आबिद अली,शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, भूषण फुसे, मनसेचे प्रकाश बोरकर, रमाकांत मालेकर, श्रीनिवास मुसळे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

या निषेध मोर्चात आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यात शहरातील विविध पक्षाचे राजकीय नेते ,शाळेतील विद्यार्थी व नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.हा मोर्चा शहरातील जिल्हा परिषद शाळा पासून राजीव गांधी चौक , बस स्थानक मार्गे वणी रोड वरील हनुमान मंदिर परिसर पर्यंत काढण्यात आला. यानंतर निषेध सभा पार पडली.

*काँग्रेसचाही निषेध मोर्चा*

शिक्षकाकडून शाळकरी मुलीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी काँग्रेस तर्फेही निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाच्या माध्यमातून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघून बस स्थानक परिसरात समारोपित झाला. येथे निषेध सभा पार पडली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे , नगराध्यक्ष नंदाताई बावणे , इस्माईल शेख , नगरसेवक नितीन बावणे,
सुरेश मालेकर, संभाजी कोवे ,गणेश गोडे, वहाबभाई
याच सोबत या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन भोयर ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) चे डॉ. प्रकाश खनके आदी उपस्थित होते. या मोर्चा पुरुष महिला सह विविध शाळेच्या शाळकरी मुलांनी सहभाग नोंदवला होता.

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *