लोकदर्शन जिवती 👉 प्रा.गजानन राऊत
जिवती- येथील स्थानिक विदर्भ महाविद्यालयात महिला विभागाअंतर्गत महिलांच्या बाबतीत अपमानास्पद व अश्लाघ्य शिवी प्रतिबंध शपथविधी घेण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर शिवी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून फलक लावण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिव्या मुक्त समाज अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यात आली. त्याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शाक्य यांनी समाजात वावरत असताना महिलांच्या भावनांचा आदर व्हावा. समाज संस्कारी होण्याकरिता महिलांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची जपणूक व्हावी असे प्रतिपादन केले.उपस्थीत विद्यार्थ्यांना शपथ देऊन महाविद्यालयीन परिसर तथा बाहेर समाजात सुध्दा शिव्यांचा वापर होणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी घ्यावी असेही सांगण्यात आले. याप्रसंगी प्रा. गजानन राऊत ,प्रा. लांडगे प्रा. डॉ.वैशाली डोर्लीकर महिला विभाग प्रमुख, प्रा.मुंडे, प्रा. राठोड, प्रा.मस्कले इतर प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.