By : राजेंद्र मर्दाने
वरोरा : शहरातील दुकानांतून प्रसिद्ध उत्पादनाचे नावाने कंपनीचे बनावटी सामान विकल्या जात आहे. याबाबतची तक्रार प्राप्त होताच वरोरा पोलिसांनी तात्काळ शहरातील ३ दुकानावर छापामार कारवाई करीत ४६ हजार ४४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे अधिकृत ब्रांडच्या नावाखाली बनावटी सामान विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती नुसार सणासुदीच्या दिवसांत अधिक नफा प्राप्तीसाठी साठेबाजी, भेसळयुक्त पदार्थांची विक्री ही सामान्य बाब बनली आहे. कमी निकृष्ट दर्जाच्या उत्पादन तयार करून विक्री केल्याने ग्राहकांच्या आरोग्यावर ही परिणाम होतो. त्यात शहरात प्रसिद्ध उत्पादनाचे नावाखाली नकली बनावटी वस्तूंची विक्री करून ग्राहकांची फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपासून वरोरा शहरात” हार्पिक”, “लाईझोल” या प्रसिद्ध ब्रांडच्या नावाखाली बनाबटी वस्तूचा शहरात काही दुकानातून विक्री व पुरवठा केला जात असल्याची तक्रार नागपूर येथील व्यवसायी अल्ताफ शेख यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून कारवाई करीत वरोरा पोलिसांनी शहरातील ३ किराणा/ एजन्सी, दुकानात छापा टाकून आरोपींकडून जवळपास ४६ हजार ४४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर दुकानातून प्रसिद्ध उत्पादनाचे नाव व डिझाईन वापरून ” हार्पिक व लाईझोल” ट्रेडमार्क आणि कॉपीराइट नोंदणी प्रमाणपत्राशिवाय आधारित ‘ हार्पिक व लाईझोल ‘अधिकृत ब्रांडच्या नावाने नेमके अनुकरण तयार करणे आणि विकणे ग्राहकांची फसवणूक आहे. तक्रारीवरून पोलिसांनी छापामार कारवाई करीत दोषींवर कॉपीराईट ॲक्ट कलम ६३,६५ भारतीय न्याय संहिता ३१८ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक नयोमी साटम तसेच ठाणेदार अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनात एपीआय शरद भस्मे, जांभुळे, पोहवा मोहन निशाद, दीपक दुधे, पोकाँ मनोज ठाकरे भावेश, इरफान चालक टीम ने केली.