विदर्भ महाविद्यालयात ” स्वच्छ्ता ही सेवा” उपक्रम संपन्न*

 

लोकदर्शन जिवती 👉 प्रा.गजानन राऊत

जिवती:- येथील विदर्भ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “स्वच्छ्ता ही सेवा” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांनी महाविद्यालय परीसर तसेच गावातील बस – स्थानक, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय परिसरातील प्लॅस्टिक एकत्र केला. प्लॅस्टिकचे पर्यावरणात विघटन होत नाही, पर्यावरणाच्या दृष्टीने ते घातक असते. त्यामुळे त्याचे विल्हेवाट लावण्याच्या हेतूने गावात फिरणारी घंटागाडीत ते टाकण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शाक्य, प्रा. गजानन राऊत, प्रा. संजयकुमार देशमुख, प्रा. सचिन यनगंदलवार रासेयो प्रमुख इतर प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *