कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाचा कणा : देवराव भोंगळे

By : Shankar Tadas

कढोली खुर्द येथे शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

कोरपना :

भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वांगीण विकासाचे कार्य करीत आहे. अनेक विकासात्मक योजना सरकार राबवीत असून तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचेल याचा प्रयत्न मोठ्या हिरीरीने करत आहे. भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत, सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा समजल्या जातो. राष्ट्रप्रथम हे ब्रीद मानून लोककल्याणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय जनता पक्षात सर्वांचेच स्वागत आहे. भाजपच्या विकासवादी अजेंड्यावर काम करून आगामी काळात या भागात भाजपाला मजबूत करण्यासाठी सर्वकारकर्ते पूर्ण शक्तीनिशी प्रयत्नरीत राहतील, असा विश्वास पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी देवराव भोंगळे यांनी बोलतानी व्यक्त केला.

कोरपना तालुक्यातील मौजा कढोली (खुर्द), आसन (खुर्द) बोरी नवेगांव व मायकलपूर येथील शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी देवराव भोंगळे यांचा प्रमुख उपस्थितीत उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांच्या नेतृत्वात माजी सरपंच निर्मला मरस्कोल्हे, वंदना चायकाटे यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री सतीश उपलेंचवार, महामंत्री प्रमोद कोडापे, रमेश मालेकर, पुरुषोत्तम भोंगळे, शशिकांत आडकिणे, महेश शर्मा, किशोर बावणे, हितेश चव्हाण,आशिष ताजणे,अशोक झाडे, विश्वंभर झाम, धम्मकीर्ती कापसे, रवी बंडीवार, जगदीश पिंपळकर, प्रदीप पिंपळशेंडे, प्रमोद पायघन, सुरेश वसू, विठ्ठल जुनगरी, गजानन भोयर, प्रमोद व्हराटे, गणेश बांगडे, सुदाम लांडे, वंदना चायकाटे, निर्मलाताई मरस्कोल्हे, गुलाब आस्वले, योगेन्द्र केवट, सतीश जमदाडे, सचिन आस्वले, भाऊराव कुळमेथे, गणेश देरकर, रवी टेकाम, सागर धुर्वे, प्रमोद शेंडे, हर्षल चामाटे, आशिष ढुमणे, संजय जुमनाके व अविनाश नामपल्ली यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.
मागील काही दिवसांपासून कढोली खुर्द ग्रामपंचायत चर्चेत आहे. येथे सरपंच निर्मलाताई मरस्कोले आणि सीताबाई पंधरे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने काँग्रेस समर्थित उमाजी आत्राम सरपंच झाले आहे. या घडामोडीनंतर भाजपाने सक्रिय होत बऱ्याच हालचाली केल्या. त्याचे फलित म्हणून उपसरपंच डॉ. विनायक डोहे आणि माजी सरपंच निर्मलाताई मरस्कोले यांनी भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. यापूर्वीच शेतकरी संघटनेचे प्रमुख कारकर्ते सुदामजी लांडे यांनी भाजपा प्रवेश करून मोठ्या बदलाचा श्रीगणेशा केला होता. भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख देवराव दादा भोंगळे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, कोरपना तालुका अध्यक्ष संजयभाऊ मुसळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावाच्या विकासाला गती देण्यासाठी हा भव्य भाजपा प्रवेश असल्याचे मनोगत डॉ. विनायक डोहे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *