अभियंत्यांचे आराध्य मोक्षगंडम विश्वेश्वरय्या

By : वृषाली वसंत फराडे

 

अभियंत्याचे आराध्य दैवत मोक्षगंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटक राज्यातील मुद्देहळी या गावी झाला. त्यांचे पुर्वज आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम या गावचे त्यामुळे मोक्षगुंडम हे नाव त्यांच्या नावाला कायमचे चिकटले. विद्वत्ता त्यांच्या घरी अक्षरशः पाणी भरत होती. संस्कारक्षम आई वडीलांच्या मार्गदर्शनाखाली विश्वेश्वरय्या हुशार आणि तरतरीत बनले. विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक बल्लारपूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण बंगलोर येथे पुर्ण झाले. म्हैसूर सरकारने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांनी स्थापत्य शास्त्रातील शिक्षण पुणे येथून प्रथम क्रमांकाने पुर्ण केले. ही परीक्षा मुंबई विद्यापिठामार्फत घेण्यात आली होती. स्थापत्य शास्त्रातील या यशाचा लौकिक हा हा म्हणता दुरवर पसरला. साहजिकच नोकरीचा समोर असलेला प्रश्न चुटकीसरशी सुटला.
त्यावेळेस अफाट पसरलेल्या मुंबई राज्य सरकारने विश्वेश्वरय्या यांची सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता म्हणून नाशिक जिल्ह्यात नियुक्ती केली. तेथील ग्रामीण आणि शहरी भागात त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या. पुण्याच्या खडकवासला धरणाचा बारकाईने अभ्यास व संशोधन करून त्यांनी स्वयंचलित शितद्वारे देशात सर्वप्रथम बसवली. ते एक नाविन्यपुर्ण काम होते. साहजिकच पाण्याचा अपव्यय थांबला. शासकीय सेवेत असताना अनेक देशांना भेटी देऊन विविध प्रकल्पाचा व धरणाचा अभ्यास करून तिथे आलेल्या नानाविध अनुभवाचा फायदा आपल्या देशाला करून दिला. पुर्व आफ्रिकेतील एडन या शहरात लष्करी वसाहतीत त्यांनी सहाय्यक इंजिनियर म्हणून काम केले.

१९०७ साली मुंबई सरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर
त्यांनी हैद्राबाद संस्थानात विशेष

सल्लागार अभियंता म्हणून काम केले. हैद्राबाद संस्थान हे त्यावेळेस पुढारलेले संस्थान होते. हैद्राबाद शहरातून दोन नद्या वाहत होत्या. इसा आणि मुसा या दोन नद्या एकत्र करून विश्वेश्वरय्या यांनी त्या दोन नद्यांवर भक्कम धरणे उभा केली. त्यामुळे पुराचा धोका कायमचा टळला आणि शहराची नव्याने रचना करता येणे शक्य झाले. त्यानंतर ते म्हैसूर संस्थानचे प्रमुख अभियंता व सल्लागार बनले. म्हैसूर संस्थानात त्यांनी सेवा बजावत असताना अनेक लोकोपयोगी व कल्याणकारी योजना राबवल्या. पण या सर्वावर कळस चढविला तो कृष्णासागर धरण आणि वृंदावन उद्यान या दोन देखण्या – वास्तूंची उभारणी करून विश्वेश्वरय्या यांना आपल्या विषयातील ज्ञान अत्यंत अचूक

असे.

ते एकदा रेल्वेने प्रवास – करत असताना रेल्वेचा बदलता
आवाज त्यांच्या कानी आला. त्या

आवाजावरून त्यांच्या असे लक्षात आले की, दीड किलोमीटर अंतरावरील रूळ पुर्ण उखडलेली आहे. चैन खेचून त्यांनी गाडी थांबवली. ड्रायव्हर धावतच त्यांच्या जवळ आला. विश्वेश्वरय्या यांनी आपली माहीती त्यांच्या कानावर घातली. ड्रायव्हरनेही आपला फौजफाटा घेऊन पुढील रूळाची पाहणी केली. आणि आश्चर्य हे की विश्वेश्वरय्या यांचा अंदाज खरा ठरला. विश्वेश्वरय्या हे एक प्रखर बुद्धीमत्ता लाभलेले शिस्तीचा भोक्ता असलेले तडफदार व्यक्तीमत्व होते. या अंगच्या व इतर गुणांच्या जोरावर अनेक मोठमोठ्या शहरांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या व भुयारी गटार या योजना यशस्वीपणे पुर्ण केल्या. विश्वेश्वरय्या यांनी केलेल्या कामाची यादी फार मोठी आहे. राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्राची कार्यक्षमता आणि राष्ट्र बांधणी या विषयी त्यांनी आपले विचार – वेळोवेळी मांडले. येथील नैसर्गिक

– ■ उपलब्ध मनुष्यबळ आणि आर्थिक स्थिती या गोष्टीचा विचार करून

– साधन संपत्ती, देशाच्या गरजा, – आपली मत पारखून घेतली. अशा या दूरदृष्टीच्या आधुनिक भारताच्या – या औद्योगिक प्रवर्तकाला त्यांच्या – कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने – त्यांना भारतरत्न हा किताब बहाल – केला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना – विनम्र अभिवादन.

– शब्दांकन

  • इंजि. कु. वृषाली वसंत फराडे

– vrushalifarade118@gmail.com

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *