दुसऱ्या टप्प्यात आसन खुर्द जि. प. उच्च प्राथमिक शाळेला द्वितीय क्रमांक

By : Shankar Tadas 

कोरपना : 
मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आसन खुर्द शाळेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
शाळेने हे यश शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक, ग्राम पंचायत आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने संपादन केले. शाळेच्या या यशाबद्दल पंचायत समिती कोरपना चे सर्वांग विकास अधिकारी विजय पेंदाम, गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड, केंद्र प्रमुख पंढरी मुसळे आणि साधनव्यक्ती पंचायत समिती कोरपना यांनी अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम पाचभाई, तंत्रस्नेही शिक्षक तुकाराम धंदरे, मारोती सोयाम, संजय निखाडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, उपाध्यक्षा मुनेश्वरी पायघन व सर्व सदस्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घेतली आणि या यशात मोलाचा वाटा उचलला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *