By : Shankar Tadas
कोरपना : कढोली खुर्द ग्रामपंचायतीमधील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन भोयर यांची अविरोध निवड करण्यात आली. 10 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत उपस्थित गावकऱ्यांनी एकमताने अध्यक्ष आणि इतर सर्व सदस्य निवडले.
समिती उपाध्यक्ष दिलीप दरेकर तर सदस्य म्हणून सरपंच उमाजी आत्राम, उपसरपंच विनायक डोहे, पोलीस पाटील सविता लांडे, पत्रकार शंकर तडस, सामाजिक कार्यकर्ते अशोक कुडमेथे, पंढरी निपुंगे, मनोज देशमुख, पुरुषोत्तम लांडे, अरुण देवाळकर, सलीम शेख, दशरथ अवताडे, संतोष रागीट, प्रमोद पायघन, कमलताई वडस्कर, मथुरा लांडे, गीता दरेकर, सुरेश पेंदोर, प्रभाकर सोनटक्के, भास्कर मत्ते, महसूल प्रतिनिधी अहिरकर, लाईनमन शेंडे, ग्रामपंचायत सचिव कु. व्ही एन भुयार यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला. मागील काही दिवस कढोली खुर्द ग्रामपंचायतीमधील राजकारण व सत्ताबदल चर्चेत होते. मात्र ग्रामसभा शांततेत पार पडून समिती निवड व इतर विषयपार पडले.