तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

By : Shankar Tadas

गडचांदूर : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर व कोरपणा तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय निर्देशानुसार तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या यावेळी तालुक्यातील 32 शाळांनी आपला सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन गडचांदूर चे थानेदार शिवाजी कदम व गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली बबन भोयर तालुका क्रीडा संयोजक प्रमोद वाघाडे क्रीडा सहाय्यक प्रीतम चौधरी निलेश बोर्डे हेमंत जंगल यांच्या हस्ते पार पडले तालुकाभरातील 14 वर्षाखालील मुले मुली 17 वर्षाखालील मुले मुली व 19 वर्षाखालील मुले मुली या गटामध्ये सामने खेळवल्या गेले यामध्ये 14 वर्षाखालील मुलीच्या गटात आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपुर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवरपुर 14 वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवरपुर 19 वर्षाखालील मुलांच्या गटात अंबुजा विद्यानिकेतन उपरवाही 17 वर्षाखालील मुलांच्या गटात होली फॅमिली पब्लिक स्कूल गडचांदूर हे संघ विजयी झालेले असून जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे याशिवाय तालुकास्तरीय कबड्डीचे सामने दिनांक 17 सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक विद्यालय कोरपना येथे आयोजित केले असून दिनांक 21 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे खो-खो चे सामने आयोजित करण्यात येत आहे जास्तीत जास्त संघाने या ठिकाणी सहभाग नोंदवण्याचे आवाहन कोरपणा क्रीडा परिषदेने केले आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *