त्या एम.फिल. अहर्ता धारक अध्यापकांना कॅशचे लाभ लागू करा. ♦️गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनची शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिनांक 14 जून 2006 पूर्वी नियुक्त झालेल्या व ज्यांनी सेवेत असताना 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै २००९ या कालावधीत एम फिल अहर्ता धारण केलेले नेटसेटग्रस्त असलेले सुमारे 1400 ते 1500 अध्यापक मागील वीस ते पंचवीस वर्षापासून विविध विद्यापीठातील सलग्नित महाविद्यालयांमध्ये नियमित सेवा देत असूनही कॅश च्या पदोन्नती पासून वंचित आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या विविध पत्रानुसार पदोन्नती करिता आवश्यक असलेल्या कॅशची लाभासाठी अध्यापकांना दिनांक 14 जून 2006 पूर्वी नियुक्त झालेल्या व ज्यांनी सेवेत असताना विविध कालावधीत एम.फिल. अहर्त धारण केलेल्या व नेट सेटग्रस्त अध्यापकाची माहिती विविध नमुन्यातील प्रस्ताव अनेकदा विद्यापीठ अनुदान आयोग व संचालक उच्च शिक्षण यांना पाठवण्यात आली असून तीच माहिती वारंवार मागून अध्यापकांना मानसिक त्रास देण्याचे कार्य अनेक वर्षापासून सुरू आहे
दिनांक 22 ऑगस्ट 2024 च्या पत्रानुसार शासनाने पुन्हा एकदा दिनांक 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै २००९ या कालावधीत सेवेत असणारे एम फिल.अहर्ता धारण केलेले अध्यापकांची प्रस्ताव माहिती विद्यापीठ अनुदान आयोग व संचालक उच्च शिक्षण यांच्याकडे पाठवण्यास सांगितली होती या पार्श्वभूमीवर तातडीने गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. सतीश कन्नाके व डॉ. ऐस.बी. किशोर यांनी प्रत्यक्ष यूजीसी नवी दिल्ली येथे कार्यालयामध्ये गोंडवांना विद्यापीठातील पात्र एम.फिल. अहर्ता धारक प्राध्यापकांना कॅश चा लाभ मिळण्यासाठी उपरोक्त प्रस्ताव दाखल करून यू.जी.सी. चे डेप्युटी सेक्रेटरी याच्यासोबत सविस्तर चर्चा केली ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. यासाठी गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशने सतत पुढाकार घेऊन पाठपुरावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयाची दिनांक 14 जून 2006 पूर्वी नियुक्त असलेल्या व ज्यांनी सेवेत असताना दिनांक 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत एम.फिल. अहर्ता धारण केलेल्या सुमारे 1400 ते 1500अध्यापकांना एम.फिल अहर्त धारण केल्याच्या दिनांकापासून कॅश अंतर्गत पदोन्नतीसाठी लवकरात लवकर पात्र ठरविण्यात यावे यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने नागपूर विभागाचे क्रियाशील शिक्षक आमदार श्री सुधाकरजी अडबाले यांना निवेदन दिले असून शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केलेली आहे. निवेदनावर मा. आमदार महोदयांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून तात्काळ पाठपुरावा करण्याबाबत आश्र्वासित केले आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ.विवेक गोर्लावार यांच्या सह्या असून संघटनेच्या शिष्ट मंडळांमध्ये सर्वश्री संघटनेचे सचिव डॉ. विवेक गोरलावार, डॉ. सतीश कन्नाके, डॉ.एस.बी.किशोर डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. राजेश हजारे, डॉ.प्रशांत चहारे व इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here