लोकदर्शन 👉मोहन भारती
गोंडपिपरी :– संत नगरी धाबा येथिल विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात सुनिल हजारे, बंडुभाऊ पाचभाई, निखिल ठाकुर, विकास पोहणे, शिवा बावणे, लज्जित रायपुरे, भिमराव खोब्रागडे, मारोती डोहणे, सोनीताई डोहणे, ज्योती अलोणे, अनिल अलोणे, शिवाजी पवार, खुशाल बावणे, जनार्दन वाघाडे, मयुर वाघाडे, अमर देवगडे, साहिल बारसागडे, गौरव बावणे, सुरज जुनघरे यासह अनेकांचा समावेश आहे. आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन सर्वांचे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, श्रीनिवास कंदनुरीवार, अशोक रेचनकर, विनोद नागापुरे, नामदेव सांगळे, संतोष बंडावार, सचिन फुलझेले, नकुल चंदनगीरवार, संदीप पिपरे, मनोज घुबडे, अनिल डोंगरे, मोहसीन शेख, बालाजी चनकापुरे, शुभम पिंपळकर, अनिल कोरडे, प्रकाश हिवरकर, शंकर येलमुले, जितेंद्र गोहणे, दिलीप पुलगमकर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.