वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्हाचे बांधकाम कामगार आणि घरेलू महिला बांधकाम कामगार यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयावर ‘धडक एल्गार ‘ मोर्चा…*

 

लोकदर्शन कोल्हापूर👉 राहुल खरात

कोल्हापूर,दि. 03/09/2024

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व ज,नरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मा. अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट् सरचिटणीस मा. सुरेश मोहिते साहेब , महाराष्ट्र प्रवक्ते मा. राज अटकोरे साहेब , पश्चिम महाराष्ट् महासचिव मा. प्रशांत वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापुर जिल्हा व शहराचे वतीने बांधकाम कामगार आणि घरेलु मोलकरीण यांना विविध योजनेचे लाभ मिळणेसाठी मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी ऐतिहासिक छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दसरा चौक कोल्हापुर पासून सकाळी ठिक 12 वाजता, धडक ‘एल्गार मोर्चा’ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय शाहुपुरी पर्यत काढण्यात आला. यावेळी, बांधकाम कामगार आणि घरेलु महिला कामगार यांच्या न्याय हक्कासाठी पुढीलप्रमाणे मागण्या केल्या होत्या.
*1) गृहपयोगी भांडी संच देण्यासंदर्भात टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करा.*
*2) साठ वर्षा नंतर बांधकाम कामगारास 5000 /- हजार रुपये पेन्शन (वृध्दापकाळ भत्ता) लागु करा.*
*3) दिवाळी भेट (बोनस) 10,000 /- हजार रुपये द्या.*
*4) बांधकाम कामगारास व त्यांच्या कुंटुबास स्थानिक हॉस्पिटलमध्ये तपासणी ते उपचार योजनांच्या अंतर्गत मेडीक्लेम योजना लागु करा.*
*5) बांधकाम कामगारांचे माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना टॅबलेट तसेच उच्च माध्यमिक शिकणाऱ्या मुलांना लॅपटाॅप द्या.*
*6) बांधकाम कामगारांच्या कुटुंबास उपचारासाठी आधार हाॅस्पीटल शास्त्रीनगर , ॲपल हाॅस्पीटल कदमवाडी , डायमंड हाॅस्पीटल नागाळा पार्क , लहान मुलांसाठी मसाई हाॅस्पीटल लुगडी ओळ कोल्हापुर ह्या हाॅस्पीटल तपासणी ते उपचार या वैद्यकीय योजना सुरू करा.*
*7) बांधकाम कामगारांचा मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना 2 लाखाचे लाभ घेण्यासाठी मृत कामगाराची 50 वयाची अट रद्द करा.*
*8) अर्ज केल्यानंतर 2 महिण्याच्या आत लाभ द्या.*
*9) बांधकाम कामगारांप्रमाणे घरेलु महिला कामगार यांना वेगळा फंड जमा करून योजना जाहिर करा.*
*10) कोल्हापुर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी सेतु केंद्र सुरु करणेत येत आहे त्या सेतु केंद्रामध्ये काम करण्यासाठी बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुंलाना त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर पहिले प्राधान्य द्या.*
*11) बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मिळणाऱ्या शैक्षणिक आर्थिक सहाय्य व विविध लाभाच्या योजनेचे वेबसाइट कायमस्वरुपी सुरू ठेऊन तात्काळ लाभ मिळण्यासाठी योग्य ते उपाययोजना करा.*
*12) नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे मुले नर्सिंग तसेच फार्मसी या वैद्यकीय दर्जाची घेत आहेत अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी ‘एक लाख रुपये’ तसेच वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ‘दोन लाख रुपये’ आर्थिक सहाय्य देण्यात यावे.*
*13) केंद्र सरकारच्या नियोजनाखाली असलेल्या रेल्वे प्रशासनाने रेल्वेमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जाहिरात करत आहे असे समजते. असे असल्यास सदर मंडळाने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचा हक्काचा पैसा असल्याने मंडळाने जााहिराताच्या नावाखाली इतरत्र मंडळाचा पैसा वापरु नये. मंडळाचा गैर वापर ताबडतोब थांबवा.*
*14) मफतलाल प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या खाजगी कंपनीने बांधकाम कामगारांना दिले जाणारे संसार उपयोगी भांडी संच वितरण करण्यासाठी सत्ताधारी राजकीय पक्षांना काम दिले असल्याने, मफतलाल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चा ठेका रद्द करा.*
*15) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात मंडाळाचे अध्यक्ष म्हणजेच कामगार मंत्री आणि सचिव यांनी मनमानी पद्धतीने कारभार चालवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याने त्यांची वर्षानुवर्ष वाढत असलेल्या संपत्तीची व कारभाराची ‘इडी’ चौकशी करा.*

*या व इतर मागणीसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त मा. विशाल घोडके साहेब स्वतः उपस्थित राहून शिष्टमंडळाच्या बरोबर सकारात्मक चर्चा करून आपल्या कार्यक्षेत्रातील जे विषय आहेत ते तात्काळ सोडवू व जे धोरणात्मक निर्णय असतील ते तात्काळ शासनाला कळवून आपणांस न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी बांधकाम कामगारांचा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जवळ येऊन कार्यालयासमोर रस्त्यावरच सर्व कामगार ठिय्या मारुन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही काळ वाहतूक व्यवस्था खोळबंल्याने पोलीस प्रशासनाने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविले सदर ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलनाचे रुपांतर सभेमध्ये झाले. यावेळेस आपणांस तात्काळ न्याय नाही मिळाला तर कामगार मंत्री व मंडळाचे मुख्य सचिव यांच्या विरोधात उग्र आंदोलन करावे लागेल कारण मंडळामध्ये मुख्य सचिव व कामगार मंत्री हे दोघेच काम पहात आहेत. त्यामुळे मंडळाची कार्यकारिणी पूर्ण नसताना दोघांनी जे काही निर्णय घेतले असतील ते असंवैधानिक आहे असे आम्हास वाटते म्हणून दोघांमध्ये मंडळाची कार्यकारणी पूर्ण होत नाही त्यामुळे सदर मंडळामध्ये मालक प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी व अन्य प्रतिनिधी तात्काळ भरून मंडळाची कार्यकारिणी पूर्ण करा. व अन्य मागण्यांचे विश्लेषण करून तात्काळ आम्हाला न्याय नाही मिळाला तर , बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात अध्यक्ष म्हणजेच कामगार मंत्री आणि सचिव यांनी मनमानी पद्धतीने कारभार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे . त्यांची ‘इडी’ चौकशी करावी याकरिता, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व कामगारांना एकत्र करून आझाद मैदान मुंबई याठिकाणी उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे यांनी दिला. यावेळेस बांधकाम कामगारांच्या समोर कोल्हापुर जिल्हाध्यक्ष मा. संजय गुदगे साहेब व सांगली जिल्हा संपर्क प्रमुख मा. संजयजी कांबळे साहेब यांनी संघर्ष केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय मिळत नाही त्यामुळे पुढील आमच्या मागण्याच्या न्याय हक्कांसाठी पुढील आंदोलनास आपली धडक मुंबईला. सज्ज रहा असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळेस पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, कोल्हापुर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, सांगली जिल्हासंपर्क प्रमुख संजयजी कांबळे कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्ष समाधान बनसोडे, जिल्हासंघटक लक्ष्मण सावरे, महिला जिल्हाध्यक्ष फरगाना नदाफ, शहर अध्यक्ष गणेश कुचेकर, जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर, हातकणंगले तालुका अध्यक्ष सलमा मेमन, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष सुहासिनी माने, कोल्हापुर महिला शहर सचिव कल्पना शेंडगे, शहर कार्याध्यक्ष देवेंद्र कांबळे, गांधीनगर अध्यक्ष प्रमोद सनदी, भारत कोकाटे, ताज कुमार कांबळे, बाबासाहेब कांबळे, सदाशिव बडगेर, अनिल माने, संगिता थोरात, कोल्हापूर जिल्हातील सर्व तालुका अध्यक्ष, बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *