*विदर्भ महाविद्यालयात जागतिक युवा दिनी एड्स जनजागृती कार्यक्रम*

 

लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत

जिवती:- येथील विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे जागतिक युवा दिनी एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शाक्य मॅडम, मा.निरंजन मंगरुळकर, चंद्रपूर जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट अधिकारी, आसमा पठाण, समुपदेशक एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय गडचांदूर, अशोक शिंदे, रूपाली मडावी, संकल्प बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, प्रा. गजानन राऊत, प्रा. सचिन यनगंदलवार रासेयो अधिकारी उपस्थित होते.
निरंजन मंगरुळकर यांनी मार्गदर्शन करताना एड्स या रोगाबद्दल सविस्तर माहिती दिली. आणि या रोगापासून बचाव करण्याकरीता कोणती दक्षता घ्यावी याबद्दल सांगितले. प्रा. गजानन राऊत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी तारुण्यात पदार्पण केल्यानंतर नकळत काही चुका झाल्या असल्यास वैद्यकीय तपासणी करून भविष्यातील धोका टाळावा असे सांगितले. प्रा. सचिन यनगंदलवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात एड्स रोग होण्याची कारणे सांगितले. संचालन प्रा. अमित बोरकर यांनी तर आभार प्रा. सचिन शिंदे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *