लोकदर्शन 👉मोहन.भारती
राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने इन्फंट काँन्व्हेंट च्या सीबीएसई, स्टेट शाखा आणि नर्सरी च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा, यशोदा यांच्या वेषभूषा, भुमिका अभिनय, नृत्य, विविध भजन, गवळणी सादर केल्या. तसेच दहीहंडी फोडून, गोळकाला चे वितरण करून उत्सव साजरा केला. स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांची मदतनीस ची भूमिका बजावली.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर, गाईड शिक्षिका संगीता लांडे, नर्सरी च्या सिमा सिंग, निता जक्कनवार यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थी, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.