विदर्भ महाविद्यालयात कौशल्य मार्गदर्शन व समुपदेशन शिबीर संपन्न*

 

लोकदर्शन जिवती 👉 प्रा.गजानन राऊत

जिवती:- येथील विदर्भ विज्ञान महाविद्यालय व अंबुजा फाउंडेशन उपरवाही (शेडी) यांच्या संयुक्त विद्यमानाने या परिसरातील इयत्ता बारावी तथा पदवीधर उत्तीर्ण बेरोजगार विद्यार्थ्यांकरिता रसायनशास्त्र विभाग, रोजगार विभाग, रासेयोतर्फे कौशल्य रोजगार मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमान्वये कौशल्य मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मंचावर मार्गदर्शक म्हणून नरेश सुगे उपप्राचार्य अंबुजा फाउंडेशन सेडी, प्रा. गजानन राउत, प्रा. चतुरदास तेलंग, प्रा. संजयकुमार देशमुख, डॉ. परवेझ अली प्लेसमेंट सेल समन्वयक, तेजराज हेपट रोजगार नियुक्ती अधिकारी, रवी मडावी संपर्क अधिकारी शेडी उपस्थित होते.
नरेश सुगे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्यात असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेउन तो आपल्या उदरनिर्वाहाकरिता उपयोगात आणून आर्थिक प्रगतीचा आलेख वाढवावा. प्रा. गजानन राउत यांनी सांगितले की, समाजातील काही दिव्यांग स्वबळावर प्रगती करू शकतात तर सुदृढ विद्यार्थ्याने मनात आणले तर कोणतेही उंच शिखर गाठू शकते. डॉ. परवेझ अली यांनी प्रास्ताविक केले त्यांत मागील काही वर्षांत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रवी मडावी आणि तेजराज हेपट यांचीही भाषणे झाली. या शिबिरात मार्गदर्शकांच्या वतीने ९० विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले तर १८ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणाकरीता निवड करण्यात आली. सदर कार्यक्रम मा.प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिनेश दुर्योधन यांनी तर आभार डॉ. योगेश खेडेकर यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *