राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिर सपन्न*

 

लोकदर्शन 👉 यशवंत कातरे

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेमध्ये महात्मे आय बँक अँड महात्मे हॉस्पिटल राजीव नगर, खामला, नागपूर येथे एम्स हॉस्पिटल टिम च्या सयोगाने आयोजित करण्यात आलेले होते, रक्तदान शिबिर करिता एम्स हॉस्पिटलमधील डॉ सौम्या दास मॅडम, डॉ रौनक सर, डॉ सुनीता महात्मे तसेच श्री महादेव पातोंड, मधुकर काळमेघ, तुळशीराम आगरकर, विनोद बरडे, अनिल तांबडे, शरद उरकुडे, यशवंत कातरे, ईश्वर मोरे, रामजी सौनाग्रे, अंकुश वरखडे, प्रशात निवांत, सौ वंदना बरडे, सौ विद्या सोनाग्रे, सौ लक्ष्मी मोरे उपस्थित होते.
रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून बहुसंख्य लोकांनी रक्तदान केले, त्यामध्ये विनोद बरडे, चिराग बरडे, अभिजित लांडे, अविनाश भागवत, अमित बरडे, अतुल वानखेडे, दिनेश पाल, गणेश पाल, राजेंद्र सातपुते, विनोद अवझे, किशोर मुराळ, सुहास हुलवाने, रणजित सुलतान, रामेश्वर सोनाग्रे, तुषार घावट, बालकदास नगराळे, राकेश पाटील, ईश्वर मोरे, यशवंत कातरे,आशिष लांडे, प्रज्वल रामटेके, निलेश थोटे, यश नंदनवार, अभय मांगे असे 32 व्यक्तींनी रक्तदान केले आहे.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मूती समिती, नागपूर यांनी प्रयत्न केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *