भाजपा कोरपना तालुका विस्तारित कार्यकारणीचे अधिवेशन

 

By : Shankar Tadas 

गडचांदूर :

कोरपना तालुका विस्तारीत कार्यकारणीची बैठक गडचांदूर येथील बालाजी सेलीब्रेशन (स्व. दादाजी मंगाम सभागृह) येथे आज उत्साहात संपन्न झाली; या बैठकीला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले.
याप्रसंगी जमलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी काळात विरोधकांच्या खोटेपणाला आपल्या केंद्र व राज्य सरकारच्या सर्व घटकांसाठी असलेल्या लोककल्याणकारी योजनांनी उत्तर देण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले.

बैठकी दरम्यान, तालुक्यातील संतोष बावणे, हिरामण देवाळकर, विलास जगनाडे, रामचंद्र खामणकर, रंगनाथ बेले, प्रियंका झाडे, वर्षा वाघमारे, शालिका बेले, प्रियंका हटवार, सिंधूताई हटवार, संगीता वाघमारे, विद्या वाघमारे व सोनाली बांदूरकर यांनी भाजपात पक्षप्रवेश केला; त्या सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुप्पटे घालून भाजपा परीवारात सहर्ष स्वागत केले.

या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोदभाऊ कडू, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री सतीश उपलेंचवार, गडचांदूर शहराध्यक्ष अरुण डोहे, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मीताई डोहे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, महामंत्री विजय रणदिवे, कोरपना शहराध्यक्ष अमोल आसेकर, किशोर बावणे, रमेश पा. मालेकर, महामंत्री प्रमोद कोडापे, शहर महामंत्री हरिभाऊ घोरे, शंकर आपुरकर, निखील भोंगळे, अशोक झाडे, रवी बंडीवार, राकेश अरोरा, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, सचिन आस्वले, प्रमोद पायघन, नूतनकुमार जीवने, संजय पिंपळशेंडे, संभा खामनकर, विश्वंबर झाम, पुरुषोत्तम भोंगळे, ओम पवार, महेश शर्मा, अनंत येरणे, विलास पारखी, पुरुषोत्तम आस्वले, संजय उपगण्लावार, शिल्पा जगताप, धर्मराज वाघमारे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शितल धोटे, महामंत्री उमा कंठाळे, नमिता विश्वास, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष दिनेश खडसे, महामंत्री नैनेश आत्राम, दिनेश ढेंगळे, विशाल अहिरकर, रंजना मडावी, ज्योत्सना वैरागडे, सचिन आस्वले, शशिकांत आडकीणे, वीणाताई मुद्दलवार, अपर्णा उपलेंचवार, सुरेश इटनकर, रुपेश्वर सिंग,भास्कर वडस्कर, विठ्ठल धांडे, मधुकर कोहळे, विनोद वाघाडे आदिंसह मोठ्या संख्येने तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *