लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपिपरी :– तहसील कार्यालय गोंडपिपरी येथे महसुल दिनाचे औचित्य साधून महसुल पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले असून आज आमदार सुभाष धोटे यांच्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थीना धनादेश, प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूल विभागाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे, धनादेशाचे वितरण आमदार सुभाष घोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत संपत राजूरकर, वासुदेव बुटले, वसंतराव नाईक शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार अंतर्गत परशुराम लेडांगे, देवराव शेडमाके, ग्रामीण विभागात पीएम आवास योजनेअंतर्गत विनोद पेंदोर, नितीन आत्राम, जीवनदास कन्नाके, विलास पिंपळकर, हरिदास कुकडकर, मनोज उराडे, संतोष डोंगरे, भारत पिंपळकर तर शहरी विभागात पीएम स्वनिधी अंतर्गत राजेश मांडरे, संदीप मानकर, प्रभाकर वाघाडे, आकाश सक्सेना इत्यादी लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच अतिवृष्टीमुळे घरांची पडझड अन्य नुकसान झालेल्या लाभार्थींना सुद्धा शासकीय मदत देण्यात आली. यात विलास बुरीकर, बंडू मंडरे, लहानू मंडरे, संदीप अलगमकर, भाऊजी मराठे, खुशाबराव गणेशकर, कवडू दुर्गे इत्यादी नागरिकांचा समावेश आहे.
यावेळी आ. सुभाष धोटे यांनी मार्गदर्शनात सांगितले की, शासन आणि लाभार्थी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून महसूल विभाग भुमिका पार पाडत असतात. सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. अनेकदा विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळत नाही. घरकुल योजना, निराधार योजना, आनलाईन पीकविमा, लाडली बहीण, वयोवृद्धांच्या योजना व अन्य योजनांसाठी गोरगरीब जनता सर्व्हर डाऊन तसेच विविध तांत्रिक अडचणीमुळे त्रस्त आहेत यावर तोडगा काढून गोरगरीब जनतेला वेळेवर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, तहसीलदार शुभम व्हटकर, गटविकास अधिकारी चनफने, नगराध्यक्षा सविताताई कुडमेथे, कृषी अधिकारी पानसरे, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी उपलवार, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, देवेंद्र बट्टे, नामदेव सांगळे, संतोष बंडावार, राजू झाडे, नगरसेविका वनिता वाघाडे, वनिता देवगडे, रंजना रामगीरकर, साईनाथ कोडापे, राजू कवठे यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.